एनसीसी दिना निमित्त ४६जणांनी केले रक्तदान
मुरुम,दि.१३
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एनसीसी व एनएसएस , एचडीएफसी बँक , श्रीकृष्ण रक्तपेढी, अश्लेष भैया मोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्तत विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अस्वले यांनी रक्तदान केल्यामुळे हृदयरोग , कँसर , मधुमेह , रक्तदाब ,यासारखे रोग होण्याचा धोका कमी होतो . रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. या उक्ती प्रमाणे प्रत्येक व्यक्तिने रक्तदान करून एखाद्या गरजवंतास जीवदान देऊ शकता यासाठी अनेक सामाजिकसंस्था , महाविद्यालयाने असे कार्यक्रम घेऊन व्यक्तिचे प्राण वाचवावे असे आव्हान त्यांनी केले . या शिबिरामध्ये एकूण 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे मॅनेजर श्री आशिष बिराजदार , भीमाशंकर तोडकरी , उपस्थित होते .
प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे , डॉ. पद्माकर पिटले, प्रा. गुंडाबापू मोरे सर श्री अमित मोकाशे , श्री विजय केवडकर , बँकेचे , रक्तपेढीचे सर्व कर्मचारी महाविद्यालयीन वरिष्ठ प्राध्यापक , प्राध्यापिका , कर्मचारी ,मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. गिरीधर सोमवंशी रासेयो कार्यक्रमाधिकारी यांनी केले तर कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले .