सोनाली कलशेट्टी, विजयकुमार कलशेट्टी या
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षक दाम्पत्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हास्ते सन्मान
अचलेर दि १२ डिसेंबर
जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ऑक्टोबर महिन्यातील धाराशिव जिल्हास्तरावरील 'पोस्ट ऑफ द मंथ' विजेते शिक्षिका सोनाली कलशेट्टी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुरूम यांना तर नोव्हेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय पोस्ट ऑफ दि मंथ विजेते शिक्षक विजयकुमार कलशेट्टी जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा आलुर ता. उमरगा या शिक्षक दाम्पत्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अशोक पाटील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दत्तप्रसाद जंगम, शिक्षक संघटनेचे राज्य नेते लालासाहेब मगर तसेच आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रमचे प्रकल्प अधिकारी सोमनाथ स्वामी आदी उपस्थित होते.