मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक, युवतीचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

 धाराशिव,दि.११

 दि.११ सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर ६ महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच आमचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम स्वरुपी करावे. तसेच आमच्या खालील मागण्या पुर्ण कराव्यात.

 देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे.

सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत, नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे, युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०.०००/- वेतन/मानधन देण्यात यावे ,काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी,सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा  यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे, शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे, वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १० टक्के राखीव जागा ठेवाव्यात. अशा प्रामुख्याने मागणी आहेत या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आले. 

यावेळी हुकु‌मते धनाजी मनोहर,उंबरे नितीन ,लाकाळ गणेश वसंत, माळी गोवर्धन अजुन,हिंगे कुमार दत्ता, शिंदे सुमित,बाळासाहेब ,श्रीमती चव्हाण पुजा रमाकांत, श्रीमती स्वामी विजया शिवानंद , हावळे पल्लवी नंद‌कुमार, चव्हाण मंजूषा रामचंद्र,माळी मोहिनी गोपाळ, इत्यादी उपस्थित होते.
 
Top