मुरुम दि.१०:
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा जि. धाराशिव येथे एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालया पासुन बसस्थानका पर्यंत मानवी हक्का विषयी घोषणा देत ही रॅली शहरात काढण्यात आली तदनंतर या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ अनिल देशमुख उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात व्यक्ती प्रतिष्ठेसाठी मानवी अधिकाऱ्याचा लढा कसा सुरू झाला व दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर मानव अधिकाराविषयीची जाणीव निर्माण झालेली आहे . आदर्श जीवन जगण्यासाठी या हक्काची आज गरज आहे असे सांगितले. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून भारतीयांना मानव हक्काचे हमी दिली आहे .
आज भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार , स्वातंत्र्याचा, शोषणापासुन स्वरक्षणाचा , धार्मिक स्वातंत्र्याचा , अल्पसंख्यांक स्वरक्षणाचा , घटनात्मक उपाय योजनेच्या अधिकारातुन हक्काच्या स्वरक्षणाची हमी दिली आहे .याविषयी सर्वांनी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले . कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन डॉ गिरीधर सोमवंशी व प्रमुख उपस्थिती उप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले तसेच 53 महाराष्ट्र बटालियन लातूरचे हवालदार राजेंद्र झाला , कोतकर, सोनटक्के नायक सुनिल काळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले कार्यक्रमाचे आभार कॅडेट ओमकार वाघमोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी , कॅडेटस मोठ्या संख्येने उपस्थित होते.