तुळजापूर शुगर प्रा. लि. तुळजापूर या गुळ पावडर कारखान्याने दिला शेतकऱ्यांच्या उसाला २ हजार ७०० दर - चेअरमन ॲड अनिल काळे 

तुळजापूर,दि.१८: शिवाजी नाईक 

तुळजापूर शुगर प्रा. लि. तुळजापूर या गुळ पावडर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला  २ हजार ७०० रुपये दर देवुन  ऊस बिल संबंधित शेतकऱ्याना रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती  कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी दिली.


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील तुळजापूर शुगर या गुळ पावडर कारखान्याचा सन  २०२४ -२०२५ या गाळप हंगामात  कारखान्याने  आतपर्यंत १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गाळप केलेल्या शेतकऱ्याच्या उसाचे बिल प्रति टन २ हजार ७०० रुपये प्रमाणे अदा करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहतूक ठेकेदाराचे व वाहन मालकाचे वाहतूक व तोडणी बिलही अदा करण्यात आले आहे.अवघ्या पंधरा दिवसांत १० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ३६ हजार पोते गुळपावडर, तर ११०० टन गुळ पावडर उत्पादन केले आहे.

 बार्शी  तालुक्यातील जवळगांव,धामणगाव, सारोळा, राळेरास, कासारी,हात्तीज, भांडेगाव व तुळजापूर तालुक्यातील काटी, इटकळ, काटगाव, काळेगांव ,निलेगाव आदीसह लोहारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास ऊस गाळपासाठी घातले आहे. त्यामुळे  ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्यास घालावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अनिल काळे यांनी केले आहे.
 
Top