नळदुर्ग महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
नळदुर्ग,दि.२१:
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एनसीसी विभागामार्फत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते. तर प्रमुख उपस्थिती इंग्रजी विभागप्रमुख डॉ. डी. जी. जाधव व कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील यांची लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. अतिश तिडके यांनी केले. धनंजय पाटील यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय सांगितले. डॉ. डी. जी. जाधव यांनी स्वच्छता ही काळाची गरज असून प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच व्यसनाच्या विळाख्यात तरुण पिढी सध्या जात असल्याचे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यार्थ्यांनी अंतर्गत व बहिर्गत स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमानंतर एनसीसी कॅडेट यांनी महाविद्यालय परिसर स्वच्छ केला.
या कार्यक्रमासाठी नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, प्रा. आशिष हंगरगेकर, ग्रंथपाल डॉ. सुभाष जोगदंडे तसेच सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट उपस्थित होते.