तेरणा युथ फाउंडेशनचे  संस्थापक मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते युवक कार्यकर्त्यांची विविध पदावर निवड

धाराशिव ,दि.२१ :

धाराशिव येथे सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव तथा तेरणा युथ फाउंडेशनचे  संस्थापक मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते युवक कार्यकर्त्यांची विविध पदावर निवड करुन नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार  करण्यात आला आहे. 


तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि  परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. या कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध पदावर पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली आहे. 
तेरणा युथ फाऊंडेशनच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी  नितीन खंडागळे, उपाध्यक्षपदी  प्रवीण शेटे (कोंड) आणि धाराशिव शहराध्यक्षपदी  गणेश इंगळगी(धाराशिव) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तुळजापूर तालुका अध्यक्षपदी  मेघराज बागल (सांगवी), उपाध्यक्षपदी  सयाजी शिंदे (मंगरूळ) आणि तुळजापूर शहराध्यक्षपदी  दिनेश पलंगे यांची निवड करण्यात आली आहे. नळदुर्ग शहराध्यक्षपदी   मुदस्सर शेख व  अशितोष नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

 
Top