मानसिक , शारीरिक बौद्धिक विकासासाठी ध्यानधारणा आवश्यक -दिगंबर कुलकर्णी
मुरुम ,दि.२१:
शनिवार दि .21 डिसेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एनसीसी , एनएसएस , करिअर कट्टा अंतर्गत आंतरराष्ट्रीय ध्यानधारणा दिवस साजरा करण्यात आला.
यावर्षापासुन पासून संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय ध्यानधारणा दिवस साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी श्री श्री रविशंकर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक दिगंबर कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात ध्यानधारणा या विषयाचे महत्त्व सांगुन मार्गदर्शन केले . त्यांनी प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये जसे शरीरासाठी योग, प्राणायाम आवश्यक आहे. तसेच मनाच्या आरोग्यासाठी ध्यानधारणा तेवढीच महत्त्वाची आहे . यामुळे अनेक रोगापासून व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत होते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व गुणांचा विकास ध्यान धारणेमुळे वृद्धिंगत करता येतो.
आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून याचे जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करण्यात येत यासाठी शाळा महाविद्यालयात या ध्यानधारणा वरती मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. हिरानाथ सगर सरांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रमुख श्री श्री रविशंकर यांचे ध्यान धारणेचे प्रात्यक्षिक कॅडेटस , विद्यार्थ्याकडुन करून घेतले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय अस्वले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , डॉ प्रदीप पाटील डॉ चंद्रसेन करे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ गिरीधर सोमवंशी व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी आभार मानले . या कार्यक्रमास डॉ उदय मोरे यांनी सहकार्य केले कार्यक्रमास प्राध्यापक , कॅडेटस , विद्यार्थी , कर्मचारी उपस्थित होते .