एक दिवसीय आंतर राष्ट्रीय ध्यान धारणा व नवीन भोजन प्रथा शिबीर उत्साहात 

जयसिंगपूर,दि.२१:

दि.21 डिसेंबर 24 नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावर ध्यान धारणा दिवस  घोषित केल्याचे औचित्य साधून तसेच  रोग निवारण करण्यासाठी  नवीन भोजन प्रथा (NDS) नवीन प्रचलित आहार पद्धतीबाबत त्रिदिवसीय शिबीर जयसिंगपूर सांगली येथे नियोजित झाले.

   या शिबिराच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त डॉ  बी व्ही चव्हाण  यांनी  भोजन पद्धती विकसित केली. ते स्वतः शिबीरात मार्गदर्शन  करण्यासाठी उपस्थित होते.
 उदघाटन प्रसंगी त्यांनी सांगितले की, रोगाचे कारण चुकीचा आहार व रोगाचे निवारण आहाराचे नियोजन  प्रजपिता ब्रह्मकुमारी जयसिंगपूर शाखेच्या मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी राणी बेहेनजी, तुळजापूर शाखेच्या स्मिता बहेनजी, कार्यक्रमाचे संचालक ब्र. कु उत्तमभाई,  निवृत्त  बँक मॅनेजर ब्र. कु. मिलिंद भाई,  धाराशिव येथील ब्र. कु. सुरेश भाई जगदाळे,  चव्हाण यांच्या धर्म पत्नी सरोज चव्हाण,  आदीजण मंचावर उपस्थित होते.  शंभर पेक्षा अधिक  शिबिरार्थी विविध ठिकाणीहुन आले होते . यावेळी आंतरराष्ट्रीय  ध्यान दिवसाच्या निमित्ताने राजयोग अभ्यासचे प्रत्यक्षित राणी बेहेनजी यांनी करवून घेतले.
 
Top