बोळेगाव येथे इंडियन आर्मी सैनिकाचा सत्कार 

वागदरी ,दि.२२: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील मौजे बोधळगाव येथील इंडियन आर्मी मध्ये नुकतेच भरती झालेले जवान अविनाश आत्माराम सुर्यवंशी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


  अविनाश सुर्यवंशी यांनी देशाची प्रमाणिक पणे सेवा करण्यासाठी अथक परिश्रम घेवून इंडियन आर्मी दलात भरती होऊन नुकतेच आर्मी ची ट्रेनिंग पूर्ण करून गावी बोळेगाव येथे काही दिवसांच्या सुट्टीवर आले असता ग्रामस्थांच्या वतीने येथील सरपंच विलास पाटील व सामाजिक कार्यकर्ते सतिश सुर्यवंशी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रा.प.सदस्य अंकुश रुपनूर, सुनील सुर्यवंशी, पोलिस पाटील कडाजी सुर्यवंशी, सहशिक्षक आप्पाजी सुर्यवंशी,नागरबाई जाधव सामाजिक कार्यकर्त्या संगिता सुर्यवंशी सह महिला, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top