नळदुर्ग - अक्कलकोट एसटी बसच्या फेऱ्या पुर्ववत नियमित सुरू ठेवण्याची मागणी
वागदरी (एस.के.गायकवाड):
तुळजापूर आगारातून सुटणाऱ्या व नळदुर्ग अक्कलकोट फेऱ्या मारणाऱ्या एसटी बस तुळजापूर आगारातून वेळेत व नियमित सोडून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे व अबालवृद्ध, महिला, ग्रामस्थ यांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास ही कमी करावा असंही मागणी भाजपा मेडीया सेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ सह ग्रामस्थ प्रवासी यानी लेखी निवेदना द्वारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तुळजापूर आगार प्रमुख यांच्या कडे केली आहे.
या बाबत आगार प्रमुखाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इ.१०वी,१२ वी , महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस जवळ येत आहेत.इ.१०वी व १२ वी चे वेळापत्रक आले आहे मात्र तुळजापूर अगाराच्या नळदुर्ग ते अक्कलकोट बस सेवेचे वेळापत्रक बिघडल्याने एसटी बस सेवा ही विस्कळीत झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना,अबालवृद्ध प्रवासाना व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेळेत एसटी बस न आल्याने वीद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते वागदरी,येडोळा,गुजनूर, शहापूर,गुळहळ्ळी मार्गे अक्कलकोट ये जा करणाऱ्या तुळजापूर आगाराच्या एसटी बस या वेळेवर नियमित सोडून प्रवासान, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ संध्याकाळ सोडण्यात आलेल्या नळदुर्ग ते वागदरी,दहिटणा मार्गे गुळहळ्ळी बस कायमस्वरूपी नियमित सोडाव्यात अन्यथा या संदर्भात भाजपा सह ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदना द्वारे देण्यात आला आहे. यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार एस.के.गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,सह कार्यकर्ते उपस्थित होते.