नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करा : रिपाइं (आठवले) सह ग्रामस्थांनी केली मागणी 

वागदरी,दि.२५:एस.के.गायकवाड:

 नळदुर्ग ते वागदरी,येडोळा,गुजनूर, शहापूर,गुळहळ्ळी मार्गे अक्कलकोट जाणारा नव्याने मंजूर झालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे‌ सिमेंट रोडचे‌ काम गेल्या सहा वर्षांपासून जगोजागी प्रलंबित आहे.ते‌‌ प्रलंबीत काम त्वरित पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी या मागणीचे  निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे ‌धाराशि जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सचिव एस.के.गायकवाडसह ग्रामस्थांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर येथे जनता दरबार प्रसंगी दिले.


‌   तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून विजयी झालेले भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२४ डिसेंबर  रोजी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पहिल्यांदाच आमसभेचे  आयोजन केले होते. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना सदर मागणीचे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गचे काम शेतकरी,शासन, प्रशासन, गुत्तेदार व न्यायालय यांच्या चक्रव्यूहात आडकले असून गेल्या सहा वर्षांपासून जागोजागी शेतकऱ्यांनी आडविल्याने अर्धवट अवस्थेत रखडले आहे.ज्याठिकाणी काम‌ रखडले आहे त्याठिकाणी रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून दगड-गोटेही उघडे पडले आहेत. त्यामुळे‌ या रस्त्यावरून वहान चालवणे मोठे जोखमीचे झाले आहे . अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वारंवार याबाबत जनतेनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन विधानसभा निवडणुक-२०२४ च्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत देशाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री ना नितीन गडकरी यांनी या रोडचे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले होते. परंतू अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही.तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या कामी योग्य तो‌ पाठपुरावा करून या रोडचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करून या रोडवरील वहातूक व्यवस्थ सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

याप्रसंगी भाजपा मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, सरपंच फुलचंद वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे महादेव मोरेसह वागदरी, येडोळा,गुजनूर, शहापूर, गुळहळ्ळी,दहीटणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top