जि.प.प्राथमिक शाळा वसंत नगर नळदुर्ग येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
वागदरी, दि.०६ :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा वसंत नगर नळदुर्ग ता.तुळजापूर येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
वसंत नगर नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विकास कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार एस.के.गायकवाड हे होते.
प्रारंभी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना एस.के.गायकवाड म्हणाले की,भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळे देशातील तमाम नागरिकांना त्यांचे मानवी अधिकार मिळाले असून विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून उच्च शिक्षण पूर्ण करून प्रशासनातील अधिकारी होऊन शासनकर्ती जमात बनण्याचा प्रयत्न करावा हीच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी सहशिक्षक हरीदास सुर्वे, श्रीकृष्ण कुलकर्णी, दयानंद सोनवणे, अविनाश राठोड,सहशिक्षका व्ही.एल.वाघमारे,नेहा कुंभलकर, युवा केंद्र कार्यकर्ती आर.एस.राठोड,सह विद्यार्थ्यी उपस्थित होते.या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सहशिक्षक दयानंद सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक अविनाश राठोड यांनी केले.
.