प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

मुरूम, ता. उमरगा, दि. ६  : 

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ६) रोजी अभिवादन करण्यात आले. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.       
                    
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अनुराधा जोशी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद.
 
Top