जिल्हा परिषद प्रशालेत  भारतीय संविधानाचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

नळदुर्ग,दि.०६

 शहरातील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूलमध्ये दि.६ डिसेंबर रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
          
  महापरिनिर्वाण दिन तथा घर घर संविधान अंतर्गत प्रशालेत व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक इनामदार निजामोद्दीन होते  तर  घर घर संविधान अंतर्गत प्रमुख व्याख्याता म्हणून परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष   मारुती बनसोडे लाभले. 
         
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सय्यद तसनीम  यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती पुदाले कविता  यांनी  करून दिला.
सर्वांचे आभार जाधव संजय सखाराम  मानले. सूत्रसंचलन श्रीमती दुगम अरुणा रवींद्र  यांनी केले.
      
 या कार्यक्रमास प्रशालेचे  शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . कदम , जाधव , शेख शफीक , जागिरदार मुजम्मिल, श्रीमती सय्यद तसनीम , कुलकर्णी अंजली बळवंतराव , श्रीमती मैंदर्गी नीलोफर , मदारसे कनिज फातेमा ,नागणे स्वाती ,  युसुफ शेख आदी उपस्थित होते.
 
Top