वर्षभराची पगार दिली गावच्या विकासासाठी ;
वागदरीच्या सरपंच तेजाबाई मिटकर यांचा आदर्शवत उपक्रम
नळदुर्ग, दि.२६:
मौजे वागदरी ता.तुळजापूर येथील लोकनियुक्त सरपंच सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी शासनाकडून मिळालेली वर्षभराची पूर्ण पगार गावच्या विकासासाठी दिली या स्तुत्य निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
साधारण वर्षभरापूर्वी वागदरी येथील ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती.त्यावेळी सौ.मिटकर यांना सरपंच पदी व त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ग्रामस्थांनी एक हाती विजयी केले होते. या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता वर्षभरात कोट्यावधींची विकास कामे केली. ज्या कामाचे भूमिपूजन झाले तेच काम काही महिन्यातच उत्तम गुणवत्ते सह करून लोकार्पणही केले गेले.यामध्ये गावातील मुख्य सिमेंट रस्ता,स्मशानभूमीमध्ये पेव्हर-ब्लॉक,बंद पडलेल्या सहा हातपंपांची दुरुस्ती,दलित वस्तीतील व्यायाम शाळा,संपूर्ण गावातील भूमिगत नाली,मुस्लिम स्मशानभूमी रस्ता,ग्रामपंचायत,जि.प.शाळा येथील रंगरंगोटी,वृक्ष लागवड,संगणक कक्ष उभारणी,व्यासपीठ,वॉल कंपाऊंड,सिमेंट बंधारे,सौर ऊर्जा लॅम्प, गावातील सर्व सार्वजनिक टाक्यांना व घरातील नळांना मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही कामे पूर्ण केली गेली.
तसेच 44 लाखांच्या विहिरी, भीमनगर येथील 10 लाखांचे सभागृह,47 लाखांची जलजीवन मिशन योजना ही कामे सुरू आहेत तर ग्रामदैवत भवानसिंग महाराज मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून 10 लाखांचा निधी,प्रधानमंत्री-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते मंजूर झाले आहेत.विशेष म्हणजे पूणे येथील धरती डेव्हलपर्स च्या माध्यमातून 600 एकर जमिनीवरती सोलार प्लॅंट उभा राहत आहे.300 एकर जमिनीचे संपादन झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल.
याशिवाय सौ.मिटकर व त्यांच्या कुटुंबीयातर्फे तरुणींसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर,गरजवंत शंभर भगिनींना साडी,दिवाळीतील शिधा- धान्य इत्यादी उपक्रम राबवले गेले.सौ.मिटकर यांचे सुपुत्र पोलीस प्राधिकरणाचे श्री.उमाकांत मिटकर यांनी चारधाम यात्रेसाठी दिलेले 25 हजार रुपये त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीकरणासाठी दिले.
दि-26-12-24 रोजी महादेव मंदिर येथे झालेल्या ग्रामसभेत दर महिन्याचे 2250/- असे वर्षभराचे 27 हजार रुपये त्यांनी ग्राम विकास अधिकारी श्री.एम.एम.तांबोळी यांच्याकडे ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले.
गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केलेल्या आव्हानाला ग्रामस्थ तन-मन-धनाने सहकार्य करतात त्यांच्यामुळेच वागदरी “आदर्श गाव” म्हणून वाटचाल करत आहे.मग मी कशी मागे राहू? आता तर उरलेल्या चार वर्षांचे मानधनही गावच्या विकासासाठी देण्याचा संकल्प मी केला आहे.
सौ.तेजाबाई मिटकर
सरपंच