प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात ; विद्यार्थ्यी , पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अचलेर ,दि.२८ :
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सच्छिदानंद अंबर हे होते.
प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी परीक्षक के.के ब्याळे व प्रा एस.डी पटवारी , प्रा डॉ पुरुषोत्तम बारवकर , धनराज हळळे , संगमेश्वर लामजने , विरेंद्र लोखंडे , सुभाष धुमाळ , पंकज पाताळे , सागर मंडले , जगदीश सुरवसे उपस्थित होते .
विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते तसेच महिला पालकही विविध प्रकारच्या पाककला तयार करून या आनंद मेळाव्यात सहभाग घेतले .
कार्यक्रमासाठी सहशिक्षिका सौ संगीता देशमुख ,नेहा माने ,शितल घोडके , सरस्वती समन ,तनुजा जमादार , प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर , गीता सत्रे , सरस्वती जाधव ,सरोजा सारणे ,अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी , सुधाराणी शेळके ,श्रीदेवी मंडले , पुजा मरबे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीनी पुढाकार घेतला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सच्छिदानंद अंबर यांनी तर सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी केले .