मुरुम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन
मुरुम ,दि.२९:
भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम ता. उमरगा जि.धाराशिव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मौजे गणेशनगर ता.उमरगा येथे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजीराव फुगटे तर उद्घाटक म्हणून
सरपंच सौ. उषाताई संजय चव्हाण ,उपसरपंच सतीश पवार, पोलीस पाटील सौ कलावती चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष माणिक राठोड ,व प्रतिष्ठित नागरिक बाला राठोड , मुख्याध्यापक राठोड , सहशिक्षक हुलगे, प्राचार्य गोविंद इंगोले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किसन माने तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी उपासे जी डी यांनी केले.
शिबिर उद्घाटन प्रसंगी प्राचार्य गोविंद इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा राठोड एस बी यांनी आभार मानले. यावेळी प्रा. वर्षा हुलगुंडे, सुजित चिकुंद्रे प्रा.प्रकाश चव्हाण प्रा. बालाजी इंगोले, प्रा. किशोर कांबळे, प्रा श्रीकांत शिंदे,प्रा विनय इंगळे प्रा रोहन हराळकर प्रा. राजेंद्र बुवा प्रा. प्रसाद इंगोले विलास चव्हाण अनिकेत सगट राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.