मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच नळदुर्ग शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीने केला आनंदोत्सव साजरा 

नळदुर्ग,दि.०६ : नवल नाईक 

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. नळदुर्ग येथे शहरातील  मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चावडी चौकात व बसस्थानक संविधान चौकातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटुन भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, पत्रकार विलास येडगे,मुकुंद नाईक, उमेश नाईक, बंडू पुदाले, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरडे, विशाल डुकरे ,शशिकांत कुलकर्णी, मल्लिकार्जुन गायकवाड, अक्षय भोई, पद्माकर घोडके, संजय जाधव, बबन चौधरी, विजय ठाकूर, सुजीत सुरवसे, पप्पू पाटील, सागर हजारे,बंडू कसेकर,अजय देशपांडे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top