तुळजापूर तालुकाध्यक्षपदी सचिन तोग्गी यांची निवड
तुळजापूरदि.०८:
पत्रकार सचिन शशिकांत तोगगी यांची व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अवघ्या पाच वर्षात पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा गंध नसतानाही केवळ संघाच्या विविध कार्यक्रमात हिरारिने भाग घेऊन स्वतःचे या क्षेत्रात अस्तित्व निर्माण केले.
जगभरातील 47 देशात पत्रकारांचे संघटन करून विविध प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे बोलताना सांगितले.