फिनिक्स फाउंडेशनच्यावतीने  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

अचलेर,दि.०७

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स  फाउंडेशन अचलेरद्वारा  संचलित फिनिक्स कोचिंग क्लासेस तर्फे भारतरत्न , महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  निमीत्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  यांच्या प्रतिमेचे पुजन व कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे  सदानंद कांबळे महाराज  यांच्या शुभहस्ते करण्यात आले .त्यानंतर प्रतिमेसमोर विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना करण्यात आले .

 यावेळी फिनिक्स फाउंडेशन अचलेर चे  संस्थापक संचालक जगदीश सुरवसे सर , तसेच  सुमित बनसोडे सर ,सिद्राम सोनटक्के , रामलिंग कलकुटगे  यावेळी उपस्थित होते .

    या कार्यकमाचे प्रास्ताविक  सारंग पुजारी यांनी केले
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त केले .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक  सदानंद कांबळे ,तसेच फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेर चे संस्थापक संचालक जगदीश सुरवसे, सहशिक्षक सुमित बनसोडे  यांनी मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैभवी दुलंगे  व प्रतिक्षा कदम  यांनी केले .तर आभार प्रदर्शन नंदिनी कुंभार व सृष्टी कदारे यांनी केले .या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
Top