जळकोट,दि.०७
प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान किंवा शास्त्र असते त्यामुळे युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे मत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले.
हॅलो मेडिकलच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेत युवा जागर जिल्हास्तरीय अभियानाचे समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॅलो फाऊंडेशनचे विश्वसत डॉ क्रांती रायमाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा दोमकुंडवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, डॉ.सजय अंबेकर, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, महिला बालकल्याणच्या प्रज्ञा बनसोडे उपस्थित होते.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादर करण्यात आले.यावेळी अभियानात उत्स्फूर्त सहभाग व योगदाना दिलेल्या शाळा व मुख्याध्यापकाचा प्रमाण पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.ज्योतिका चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण,ग्रा.प.सदस्य माणिक राठोड, सुभाष नाईक, शिवाजी चव्हाण, नागेंद्र गुरव, किरण कांबळे,किरण ढोले, कार्ले ,कुंचगे,लंवग, चौगुले,हाके,मुकम अमित खारे यांच्या सह शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ शुभांगी अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान समन्वयक बसवराज नरे, सतीश कदम,नागिणी सुरवसे,समुपदेशिका वासंती मुळे, यांच्या सह श्रीराम जाधव, इंदुबाई कबाडे, प्रणिता भोसले,स्वाती पाटील, ज्ञानेश्वर जाधव, दिनकर गाढवे, नूतन गायकवाड व गावपातळीवरील तीस पुरुष तीस महिला प्रेरिका अभियान राबविण्यासाठी प्रयत्न केले.