किल्लारी गावात चौथी विशाल बौध्द धम्म परिषद : भिमगितांचा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
सरसेनानी आनंदराज आंबेडकर याची बौद्ध धम्म परिषदेला प्रमुख उपस्थित
नळदुर्ग,दि ०१ :एस.के.गायकवाड
तक्षशिला बुद्ध विहार, तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी ता.औसा जि. लातूर या ठिकाणी रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथ्या विशाल बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी पूज्य भदन्त धम्मसार थेरो यांच्या पुढाकाराने विशाल बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते . बौध्द धम्म परिषदेचे चौथे वर्ष आहे. दि.१२ जानेवारी २०२५ रविवार रोजी सकाळी ११ वा.दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमित्ताने विक्रम नगर लातूर येथील सुप्रसिद्ध गायिका संगीता नरसिंह गायकवाड व टि.व्ही.स्टार प्रज्ञा नरसिंह गायकवाड यांच्या भिमगीत गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच महाकरुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांनी लोक कल्याणाचा मार्ग दाखवत बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी धम्माचा उपदेश केला असून धम्म श्रवण केल्याने मनुष्याला उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळाते.प्रत्येकांच्या व्यक्तीगत कौटुबिक आणि सामाजिक जिवनात मांगल्य निर्माण करण्याचे कार्य धम्म संस्कार करित आहेत.म्हणून किल्लारी गावात येत्या १२ जानेवारी रोजी चौथ्या विशाल बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांची महत्त्वपूर्ण धम्मदेशना (प्रवचन) होणार आहे.
याप्रसंगी भदन्त डॉ.यश काश्यपायन भदन्त पय्यातिस्स थेरो , भदन्त महाविरो थेरो , भदन्त पय्यानंद थेरो , भदन्त धम्माशिल थेरो , भदन्त धम्मविरोयो थेरो , भदन्त राजरत्न थेरो , भदन्त नागसेन बोधी थेरो , भदन्त सुमेधनजी नागसेन , भदन्त विनयशिल , भदन्त सुमंगल , भदन्त संघानंद भदन्त धम्मदिप , भदन्त धम्मप्रिय
भदन्त बुद्धशिल , भदन्त . बोधीराज , भदन्त संघानंद , भदन्त अमरज्योती , भदन्त धम्म बोधी आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या धम्म परिषदेस औशाचे लोकप्रिय आमदार
अभिमन्यू पवार , चंद्रकांत कांबळे सह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी दि. १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित चौथ्या बौद्धधम्म परिषदेला आंबेडकर प्रेमी नागरिक,बौद्ध उपासक आणि उपासिकानी उपस्थित रहावे आसे अवहान संयोजक पूज्य भदन्त धम्मसार थेरो व या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा उपसरपंच युवराज गायकवाड यानी केला आहे .