तुळजापूर लाईव्ह दिनदर्शिकेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, चेअरमन सुनिल चव्हाण यांच्या हास्ते थाटात प्रकाशन
श्री क्षेत्र मैलारपूर येथे मंगळवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून तुळजापूर लाईव्ह न्यूज पोर्टलच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या थाटात आमदार राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
तुळजापूर लाईव्ह न्युज पोर्टलचे जवळपास ७७ लाख व्ह्युज झाले असून दिनदर्शिकेचे १५ वे वर्ष आहे. या दिनदर्शिकेत श्री तुळजाभवानी मातेच्या २०२५ मध्ये साजरा होणा-या धार्मिक कार्यक्रमासह नवरात्रातील कार्यक्रमाची माहिती, त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील यात्रा, उर्स आदीची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार शिवाजी नाईक यांनी पुष्पहार घालून आमदार राणाजगजितसिंह पाटील, चेअरमन सुनिल चव्हाण यांचे सत्कार केले. त्यानंतर दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा पार पडले. यावेळी मान्यवरांनी दिनदर्शिकेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपचे लोकसभा प्रमुख तथा
माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक , प्रभाकर मुळे भाजपचे नेते सुशांत भूमकर, जिल्हा सरचिटणीस अँड दिपक आलुरे, अशासकीय सदस्य, संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेचे तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष विलास राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, विनोद (पिटू) गंगणे, शिवसेना धाराशिव उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, प्रशांत लोमटे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, भाजप शहराध्यक्ष धिमाजी घुगे, उपाध्यक्ष बबन चौधरी, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके,माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे ,निरंजन राठोड, छमाबाई राठोड, किशोर नळदुर्गकर, अक्षय भोई, कुस्ती आखाड्याचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकुर, कार्याध्यक्ष विनायक बंडू पुदाले, शशिकांत पुदाले, अँड धनंजय धरणे, पत्रकार आय्युब शेख, दादासाहेब बनसोडे, सोमनाथ कोरे, सागर हजारे, महादेव पाटील, अनिल पुदाले, नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष संदीप सुरवसे, डॉ जितेंद्र पाटील , संजीवनी मेडिकलचे संजय जाधव, अजय दासकर, अरुण नाईक, अविनाश बंजारे, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.