स्वाभिमानी शिक्षक , कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
धाराशिव,दि.१४:
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने आज धाराशिव येथे राज्यस्तरीय आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा धाराशिव येथे श्री . सुधीर पाटील, ॲड तुकारामजी शिंदे प्रदेशाध्यक्ष कुणबी मराठा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष,सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबईचे प्रा .डॉ बापूसाहेब आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
राज्याच्या विविध भागात शिक्षण क्षेत्रास सेवा म्हणून पाहणारे , आपल्या कर्तव्यातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन प्रत्येक भागात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या राज्यातील विविध जिल्हयातील शिक्षकांना व शाळांना सन्मानित करण्यात आले . यामध्ये विनाअनुदानीत असलेल्या २१ शिक्षकांना या प्रसंगी पुरस्कार दिला गेला यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब अडसूळ यांनी संघटना ही नेहमी शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी गंभीर असून त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच शिक्षण क्षेत्रातील गुणवंताचे कौतुक करणं व व शिक्षण क्षेत्रास बळकटी देण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यासाठी संघटना नेहमीच तत्पर राहिली आहे आणि यापुढेही शिक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे उद्गार त्यांनी यावेळी काढले . याप्रसंगी प्रा गंगाधर पडनुरे, प्रदेश सचिव,मारुती खरात प्रदेश कार्याध्यक्ष, प्रा. देविदास जगताप प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. शिवाजीराव होनकडे प्रदेश उपाध्यक्ष,डॉ दत्तात्रय काळेल,प्रदेश कार्याध्यक्ष,संजयकुमार घोडके प्रदेश प्रवक्ते, गणेश नावडे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख, डॉ भाग्यश्री राठोड महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर, मीनाक्षी जाधव सचिव, स्वाती खरवले सोलापूर शहराध्यक्ष, रमेश लोखंडे उपाध्यक्ष सदसंकल्प शिक्षण समाजसेवा संस्था सोलापूर, ज्ञानदीप शिक्षण समूहाचे व्यवस्थापक वाहिद सय्यद , विठ्ठल नरवडे , तानाजी म्हेत्रे , प्राचार्य सुहास वडणे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रसंगी 30 शिक्षक,20 मुख्याध्यापक, 15 शाळा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले राज्यभरामधून सांगली सातारा कोल्हापूर पुणे यवतमाळ,सोलापूर, नागपूर जळगाव श्रीगोंदा, हिंगोली इत्यादी भागांमधून मोठ्या संख्येने शिक्षण क्षेत्रातील गुरुजन , जाणकार या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते .
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री गणेश नावडे , सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे, यांनी तर सर्वांचे आभार प्रदेश कार्याध्यक्ष मारुती खरात यांनी मानले .