अणदूरच्या कार्यकर्तुत्वाचा सुगंध,राज्यभर दरवळतोय- सदगुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर
अणदूर,दि.१४:
शेतकरी आणि कष्टकरी यांची जाण असलेला वयाचे 90 पार केलेले तरुणांनाही लाजवेल अशी कामाची धमक आणि निष्ठ असलेले सर्वसमावेशक नेतृत्व अणदूरच्या मातीतील सुगंध राज्यभर दरवळतोय याचा सर्वांनाच अभिमान असल्याचे गौरव उद्गार विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे सह अध्यक्ष सदगुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
अणदुर ता.तुळजापूर येथील हुतात्मा स्मारकात जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व 90 वर्षे पूर्ण झालेल्या दीपस्तंभ चा कृतज्ञता सन्मान सोहळा व सत्कार प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार,, श्री श्री गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, माजी जि प सदस्य महादेव आप्पा आलूरे, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बाबुराव कुलकर्णी, नीलकंठ नरे, रोहिणीबाई घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजात माणसे येतात आणि जातात, मात्र बोटावर मोजण्या इतकेच माणसे कायम जनमानसात ओळख ठेवतात. त्यांचाच हा आदर्श युवा पिढीला प्रेरणा देणारा असून निव्वळ पैसा आणि प्रतिष्ठा मुळे माणूस मोठा ठरत नसून त्याच्या कार्यकर्त्यावर त्याचे लौकिक अवलंबून असून जय मल्हार पत्रकार संघ विविध समाज उपयोगी व दिशादर्शक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श घालून देण्याचे काम निश्चितच गौरवशाली व प्रेरणादायी असल्याचे सांगून संघाचे कौतुक केले. ज्येष्ठ आणि संस्थांचे शतक पूर्ण झाल्यानंतर शतकोत्सव साजरा करण्यास येणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली.
राष्ट्रभक्ती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार चंद्रकांत हागलगुंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री चव्हाण म्हणाले की, खंडोबाच्या पावन नगरीत राज्याचे नेतृत्व करण्याची तालुक्यातील जनतेसाठी तब्बल साठ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली असून, या संधीचे तालुक्याचे नंदनवन करण्याची आणणे विविध प्रकल्प राबवून वेगळा आदर्श निर्माण करण्याची तालुका वाशीयांनी विशेषतः ग्रामस्थांचे उपकार विसरू शकत नसल्याचे सांगून स्वर्गीय आलोरे गुरुजी व मी दोघांनी जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व केले आज घ डीला तिसरी पिढी राजकारण कम आणि समाजकारण अधिक काम करीत असून त्याला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे विशेष काम पत्रकार करीत असल्याचे प्रशंसा यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, सरपंच रामचंद्र आलूरे, यांनीही मनोगत व्यक्त करून संघाच्या कार्याचे कौतुक केले.
प्रास्ताविक शिवशंकर तिरगुळे, सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार, सन्मानपत्र वाचन चंद्रकांत गुड्ड तर आभार शिवाजी कांबळे यांनी मांडले. या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.