पत्रकारीतेमध्ये समाज परिवर्तनाची ताकद असून समान्या कार्यकर्त्याना सामाजिक कार्य करण्यासाठी खरी ऊर्जा मिळते: विलास राठोड
नळदुर्ग,दि.१७:
पत्रकारीता म्हणजे समाज सेवेचे व्रत्त असून पत्रकारीतेमध्ये समाज परिवर्तनाची ताकद असून कार्यकर्त्याना सामजिक कार्य करण्यासाठी खरी उर्जा मिळते असे प्रतिपादन संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष विलास राठोड यानी बोलताना केले.
नळदुर्ग शहर भाजपाच्या संपर्क कार्यालयात नळदुर्ग व परिसरातील पत्रकारांचा गौरव विलास राठोड आणि मित्र परिवारांच्या वतीने फेटा बांधून डायरी व लेखनी देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकाराविषयीआपल्या भावना व्यक्त करताना विलास राठोड हे बोलत होते .
यावेळीनळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,पत्रकार तानाजी जाधव, विलास येडगे, उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, भैरवनाथ कानडे, अयूब शेख, लतिफ शेख, निजाम शेख, एस.के. गायकवाड, सतिश राठोड, किशोर धुमाळ,पत्रकार मित्र अमर भाळे, भाजपाचे श्रमिक पोतदार, सचिन राठोड,अबुल हसन रजवी आदी उपस्थित होते.