रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्गावर वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगत महामार्ग पोलिसानी केले प्रबोधन
तुळजापूर,दि.१८:
शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सोलापूर धुळे महामार्गावरील तामलवाडी ता.तुळजापूर शिवारातील टोल नाका याठिकाणी सर्व वाहनचालकांना वाहतूक नियम सांगत दंडा बाबतची माहितीचे मार्गदर्शन करून नळदुर्ग महामार्ग पोलिस केंद्राच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रबोधन केले.
रस्ता सुरक्षा राबवण्याच्या उद्देशाने अपर महासंचालक (वा.)म .रा. मुंबई, डॉ. सुरेश कुमार मेकला पोलीस अधिक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती रूपाली दरेकर, विभागाचे पोलीस उपअधिक्षक दिगंबर डीसले , पोलिस निरीक्षक चौधरी , प्रभारी अधिकारी महामार्ग पोलिस केंद्र नळदुर्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता पटाईत, हवालदार संदीप सुरवसे, अमोल बनसोडे , पो.कॉ. गणेश अतकरे , चालक इरफान कुरेशी सर्व अंमलदार यांनी महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छ.संभाजीनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने सोलापूर धुळे महामार्ग ,(NH 52) येथील तामलवाडी ता.तुळजापूर शिवारातील टोल नाका येथे कारचालक, ट्रॅव्हल्स चालक, दुचाकी चालक यांना इंटरसेप्टर कारची माहिती तसेच वाहतूक नियम व दंडा बाबतची माहितीचे मार्गदर्शन करून प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास बहुसंख्य
चालक व प्रवासी उपस्थित होते.