पञकार संरक्षण समिती" च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री .विरभद्र ऊर्फ सतीश शांताप्पा पिसे यांची निवड

तुळजापूर,दि.१८:

 "पञकार संरक्षण समिती" च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री .विरभद्र ऊर्फ सतीश शांताप्पा पिसे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र  राज्य पञकार संरक्षण समितीचे संस्थापक  अध्यक्ष विनोद  पञे 
यांनी पिसे यांना नियुक्ती पञ शनिवार दि.१८जानेवारी २०२५ रोजी दिले आहे.

 नियुक्ती पत्रात पुढे नमुद केले आहे की, "पञकार संरक्षण समिती" तुळजापूर तालुका अध्यक्ष या पदावर विरभद्र ऊर्फ सतीश शांताप्पा पिसे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पञकार यांच्या व कुटुंबियांच्या समस्या , अडचणी सहकार्याच्या भावनेतून सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो. 

तसेच आपल्या समितीमध्ये पञकारीतेच्या विविध श्रेञातील तसेच सामाजिक कार्याची आवड असणा-या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात येणारे स्ञी , पुरुष , युवक व युवती यांनाही सहकार्याच्या भावनेतून त्यांच्या इच्छेनुसार सोबत घ्यायचे असल्यास त्यांनाही या समिती मध्ये सन्मानपूर्वक काम करण्यास संधी द्यावी . समितीने जी जबाबदारी आपणावर सोपवली आहे ती निष्ठेने पार पाडाल अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल पिसे यांचे माजी सरपंच अशोकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के,  उपसरपंच प्रशांत नवगिरे,  प्रकाश चव्हाण, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड आशिष सोनटक्के, पत्रकार शिवाजी नाईक, चंद्रकांत गुड्ड, चंद्रकांत हागलगुंडे, भगवंत सुरवसे, अजित चव्हाण, जाहिर इनामदार, सचिन वामन कदम आदीसह विविध क्षेत्रातील अनेकानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.



                           
विनोद एन. पञे 
संस्थापक / अध्यक्ष 
पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र 
र. जि. महा. 27 / 16 
एफ - 18386 / 16 

प्रतिलिपी - 

1. मा. शहर पोलीस स्टेशन , तुळजापूर
   2. मा. तहसीलदार    साहेब , तुळजापूर
 
Top