अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा बादशहा --- चंद्रकांत गुड्ड उर्फ अणदूरगावची माय
जीवन फार मस्त आणि व्यस्त आहे, कुणासाठी स्वस्त असले तरी जीवनाची वाटचाल करताना संघर्ष मात्र खूपच कठीण असतो. त्यातूनही दुसऱ्यासाठी निस्वार्थ भावनेने स्वतःच्या संसारापेक्षा इतरांसाठी स्वेच्छने वेळ देणे हल्लीच्या जगात फारच कठीण झाले आहे. या सर्व बाबींना फाटा देऊन मित्रासाठी काहीतरी करण्याची महत्वकांक्षा बोटावर मोजण्या इतक्याच लोकांकडे पहावयास मिळते. त्याला अपवाद आहे अणदूर गावची माय उर्फ चंद्रकांत गुड्ड होत.
गरीब, वंचित, उपेक्षित मरणाच्या काठावर आणि हाताबाहेर गेलेले आरोग्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याची किमया मात्र हरहुन्नरी, हजर जबाबी, स्वतःचे प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा इतरांच्या सुख दुखासाठी, त्यांच्या अडचणी, समस्यांना अग्रक्रम देणारे पत्रकार बहुआयामी कलाकार, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा बादशहा चंद्रकांत गुड्ड यांचा आज 30 जानेवारी जन्मदिन. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त जय मल्हार पत्रकार संघ, 8 फार्मा ग्रुप, खडकाळी ग्रुप, नादान ग्रुपच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
वास्तविक पाहता प्रत्येक जण स्वतःसाठी, कुटुंबासाठी वाटेल ते आवाहनस सामोरे जाऊन विविध प्रश्न मार्गी लावताना पावलो पावली पहावयास मिळतो. मात्र स्वतःबरोबर समाजाचे काय देणे लागते याचा सारासार विचार करून "सत्यम शिवम सुंदरम" याच मार्गाने चालणारे मात्र अपवादात्मकच असतात. चंद्रकांतचा स्वभाव फारच हळवा मात्र पटत नसेल तर त्या मार्गाला ब्रेकच! स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, मात्र त्याच स्वभावात औषध कडू असले तरी इलाज मात्र खात्रीशीरच हे गणित मात्र चंद्रकांतच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरते. दुर्धर आजार असलेल्यांना, ना ओळख ना पाळख तरीही हा पट्ट्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करून त्या दुर्धर आजारी माणसाला जीवन जगण्याची त्याची तळमळ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जडीबुटी ,झाडपाला गुजरातहून आणून जगण्याच्या अशा सोडलेल्यांना आशेचा किरण बनून शेकडो लोकांना नवजीवन व जगण्याचा मूळ मंत्र दिलेला आपण पाहतो हे मात्र विशेषच, म्हणूनच गोरगरीबांचीआधुनिक धन्वंतरी म्हणजे चंद्रकांत गुड्ड आहेत.
ना कुणाच्या अध्यात, ना कुणाच्या मध्यात आपण आणि आपले काम भले हा त्यांचा दिनक्रम, शेतीवर अलोट प्रेम संपूर्ण शेती स्वतःच करणे स्वतःच उत्पन्न घेणे हा त्यांचा स्वभाव त्यातच त्याला साथ देणारे अर्धांगिनी खरोखरच हा प्रवास वाट चुकलेल्याना प्रेरणा आणि अचूक दिशा देणारा म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
गेली वीस वर्षापासून फक्त सकाळ या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून त्यांची पंचक्रोशीत खास ओळख आहे, प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, स्वतःबरोबर इतरांच्या सुप्त कलागुणांना प्रेरणा देणारा, कलाक्षेत्रात मात्र वेगळाच हातखंडा त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस पुन्हा दूर जाणे मात्र दुरापास्तच. प्रत्येकाचे सुखाची अपेक्षा वेगवेगळी मात्र आहे त्यात समाधान म्हणून दुसऱ्याच्या कामासाठी किती उपयोगी पडतो यातच त्याला सर्वस्वी समाधान वाटते. असे अफलातून भेटणारी माणसे आणि सहवास लाभणे अशक्यच मात्र आमच्यासारख्याना नशिबाने मिळाले हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज वाटत नाही.
चंद्रकांतनी कोरोनापासुन आजतागायत हजारो गाणी गाऊन त्यांच्या कलेचे दर्शन घडवले आहे, त्यांच्यातील लपलेला कलावंत त्यांनी बाहेर काढला आणि शेकडो कलाकारांना त्यांनी घडविण्याचा प्रयत्न केला आहे
मायीला पर्यटनाची खूपच आवड, या आवडीमुळे तो सवड काढून असंख्य सवंगड्यांना सोबत घेऊन प्रतिवर्षी अमरनाथ यात्रा हा विशेष उपक्रम. अयोध्यातील बाबरी मशीद पाडन्यापासून "मंदिर वही बनायेंगे" हा ध्यास घेऊन गावागावातून विश्व हिंदू परिषदेचे स्वर्गीय संघटन मंत्री भुजंगराव घुगे यांच्या सानिध्यात राहून विटा गोळा करून अयोध्येपर्यंत पोहोचवण्याची जिल्ह्याची जबाबदारी चंदूचीच...
मोटारसायकलीवर अणदूर ते आयोध्येचा अनेकवेळा प्रवास करणारा रामभक्त म्हणजेच चंद्रकांतच!
कोरोना काळात माणूस माणूसच काय सख्या कुटुंबालाही एकमेकापासून चार हात दूर अशा या जीवघेव्या परिस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, कर्नाटक राज्याचे संघटन मंत्री कै भुजंगराव घुगे यांचा मंदिर निर्माण कार्यातच मृत्यू झाला. मग काय अखेरचे दर्शन घेण्यासाठी अणदूर ते आयोध्या हा मोटर सायकल वरून प्रवास निव्वळ दैवयोगच.
या बहुरंगी ,बहुआयामी स्वतः ऐवजी इतरांचे सुखदुःख आपलेच समजून यशस्वी वाटचाल करणाऱ्या आमच्या सहका-यास त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त दिशाशक्ती न्यूज परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
चंद्रकांत हागलगुंडे
जेष्ठ पत्रकार अणदूर,ता तुळजापूर