क्रीडा क्षेत्रातील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
नळदुर्ग,दि.३०:
क्रीडा क्षेत्रात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने पारितोषिक देवुन गौरव करण्यात आला.
जळकोट ता.तुळजापूर येथील कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा चंचलादेवी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधिकारी माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण उपस्थितीत होते.यावेळी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुले मुली विविध खेळात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत यश संपादन केल्याने त्यांना संस्थेच्या वतीने बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण,ज्योतिका चव्हाण, रेखा चव्हाण, रवि चव्हाण, अभिजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत राठोड, शांताबाई राठोड, कांताबाई पवार, कमळाबाई राठोड,विठ्ठल जाधव,सुभाष नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, नेमिनाथ चव्हाण , निवृत्त मुख्याध्यापक महादेव राठोड,पांडुरंग चव्हाण, सिताराम राठोड, मोतीराम राठोड, बाबुराव चव्हाण,व्यंकट राठोड, माणिक राठोड, यशवंत राठोड, सिद्राम पवार, सुभाष चव्हाण, शिवाजी चव्हाण,आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद पांढरे तर सुत्रसंचलन बारावीच्या विद्यार्थी गौरी गंगणे,रुतुजा कदम, क्रांती कदम यांनी केले . कार्यक्रमास नागेंद्र गुरव, बाळासाहेब मुखम, सुरेश कोकाटे,बी.जी.हाक्के, संतोष दुधभाते, आप्पासाहेब साबळे,किरण ढोले, बालाजी राठोड,किरण कांबळे, खंडेराव कार्ले,दुर्गस कदम, शांताबाई चौगुले, प्रमिला कुंचगे, कल्पना लवंद, मयुरी कांबळे, अस्मिता लब,डे अमित खारे, शंकर चव्हाण आदि उपस्थित होते.