पत्रकार संरक्षण समितीचे नुतन तालुका अध्यक्ष वीरभद्र पिसे यांचे नळदुर्ग व जळकोट येथे सत्कार करुन पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
नळदुर्ग,दि.२२ :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचे नुतन तुळजापूर तालुका अध्यक्ष वीरभद्र पिसे यांचे नळदुर्ग व जळकोट येथिल मान्यवरांनी गौरव करुन पुढील वाटचालीस पिसे यांना शुभेच्छा दिले आहेत.
नळदुर्ग शहरात वीरभद्र पिसे यांचा पत्रकार मित्रांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी पत्रकार सचिन कदम, जहीर इनामदार, एस के गायकवाड, चंद्रकांत गुड्ड, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, प्रवीण सगर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना वीरभद्र पिसे यांनी सांगितले की, सर्वाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील "पत्रकार" यांच्या अडी अडचणी सोडवुन त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक व आभार एस के गायकवाड यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट याठिकाणी नुतन तालुका अध्यक्ष वीरभद्र उर्फ सतीश पिसे यांची निवड झाल्याबद्दल जळकोट येथील बॅडमिंटन ग्रुप व गणेश सोनटक्के मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष व कार्यकारिणीवर निवड झालेले सचिन व्ही कदम यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी साने गुरुजी कथामाला पुरस्कार प्राप्त पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक विजयकुमार मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के, तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. आशिष सोनटक्के, पत्रकार मेघराज किलजे, अरुण लोखंडे, विठ्ठल मोरे, बालाजी पाठक,दिनकर कलाल,तानाजी गंगणे, महादेव पवार, सचिन कदम, ब्रह्मानंद कदम ,अमर खारे ,नागनाथ किलजे,स्वामी ,घोटाळे , प्रविण सगरसह अनेक मान्यवर उपस्थित होते.