माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी कु स्वाती पवार मैदानी धावणे स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविले
नळदुर्ग,दि.२२:
नळदुर्ग येथील वसंतनगरच्या माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी कु पवार स्वाती सुधाकर ही १७ वर्ष वयोगटातून मैदानी धावणे 200 मीटर स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविले आहे. त्याची निवड राज्यस्तरावर झाल्याने त्याचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
बहुजन कल्याण विभाग लातूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सन 2024 -25 मध्ये आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेत वरील शाळेतील विद्यार्थिनी कु पवार स्वाती सुधाकर ही 17 वर्षे वयोगटातून 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले आहे .
विजेत्या स्वाती पवार हिचे इतर मागास बहुजन कल्याण लातूर विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप राठोड यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष विशाल जाधव, मुख्याध्यापक एन जी बिराजदार, सहशिक्षक पवार डी जे, श्रीमती माळी एस आर, जाधव एस व्ही, राठोड एस एच, रासुरे डि.एच, श्रीमती ढोणे , वस्तीगृह अधिक्षक श्रीमती राठोड एम के आदींनी विजेत्या विद्यार्थिनीचे गौरव करून अभिनंदन केले.