नळदुर्ग जिल्हा परिषद प्रशालेत  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस  साजरा 

नळदुर्ग,दि.३:

शुक्रवार दि.3 जानेवारी  रोजी  नळदुर्ग जिल्हा परिषद प्रशालेत  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.  

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक  इनामदार निजामोद्दीन मैनोद्दीन तर  प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ.सौ. स्वाती शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शकीला तांबोळी, अंगणवाडी कर्मचारी किरण सोनवणे,शालेय व्यवस्थापन समिती, माता-पालक व सखी सावित्री मंचचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व माता भगिनी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
      
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कदम  यांनी केले. पालकांना मार्गदर्शन प्रशालेतील सहशिक्षक संजय जाधव ,तसनीम सय्यद, कविता पुदाले, निलोफर मैंदर्गी, शमशाद दखनी यांनी केले.  यावेळी स्वाती कांबळे, डॉ. स्वाती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार अंजली कुलकर्णी यांनी मानले तर सुत्रसंचलन दुगम अरूणा यांनी केले.
       
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षका झिनत हन्नूरे , शाळेचे कर्मचारी स्वाती नागणे   युसूफ शेख यांनी पुढाकार घेतला.
 
Top