प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शरण पाटील यांच्या हस्ते ; नेत्रदीपक कवायती सादर करून दिली मानवंदना
मुरूम, ता. उमरगा, २७. २५ : डॉ सुधीर पंचगल्ले
येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या भव्य मैदानावर प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, नूतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. २६) रोजी उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सौ. संपदा पाटील, श्वेता पाटील, स्मिता पाटील, संगीता पाटील, विठ्ठलसाई साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, कोथळीचे नंदकिशोर लोहिया, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक राजू भोसगे, प्रा. डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, सच्चिदानंद अंबर, सचिन पाटील, योगेश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभी शरण पाटील यांना सजवलेल्या आकर्षक गाडीतून व पुढे दोन बुलेटस्वरांची शिस्तबद्धपणे संपूर्ण पथकांचे निरीक्षण केले. अनुशासनबद्ध हालचाली, गणवेशातील सुसंवाद, नेत्रदीपक कवायती करत आठ पथकांनी पथसंचलन करीत राष्ट्रध्वजास व मान्यवरांना मानवंदना दिली. लक्ष्मी हडपे (इयत्ता सहावी) व शिवकन्या भालकाटे (इयत्ता नववी) या सैनिकांच्या गणवेशात हिंदीतून भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता सहावी (ब) च्या विद्यार्थिनींनी मराठी गीतावर लेझीम, नूतन शाळेच्या पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी हिंदी गीतावर नृत्य, इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी एकली एकली चालू रे... या बंजारा गीतावर नृत्य, नूतन शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गीतावर नृत्य, इयत्ता सातवी (ब) च्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली... या मराठी गीतावर टाळ मृदंगाच्या निनादात महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाचे परंपरा सादर, इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी बंजारा गीत, या कार्यक्रमाची सांगता सामूहिक घोषणा व देशभक्तीपर इयत्ता नववी (ब) च्या विद्यार्थिनींनी जय जवान जय किसान.... या गाण्यांनी झाली.
उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, राजशेखर कोरे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, राधाकृष्ण कोंढारे, क्रीडा शिक्षक सुजित शेळके, सांस्कृतिक कार्यक्रमाचे शिवशंकर तांबडे, रविकांत स्वामी आदींनी पुढाकार घेतला. पालक व गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान मुजावर तर आभार करबसप्पा ब्याळे यांनी मानले.