कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचा,लोकप्रतिनिधींनी मलिदा खायचा ; तब्बल १४ वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावरील अणदुर येथे काम अर्धवट

अणदूर. दि.२७: चंद्रकांत हागलगुंडे 

राज्याच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक अर्धवट कामाचा इतिहासात कोरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ..हैदराबाद गेले 14 वर्षापासून अर्धवट अवस्थेत असून असंख्य प्राण गमावूनही याकडे कार्यकर्त्याने संघर्ष करायचा आणि मलिदा मात्र लोकप्रतिनिधिनी खायचा असे केविलवानी अवस्था निर्माण झाला असून या दुर्दैवास्तेकडे कोणी लक्ष देणार का हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने तीव्र संताप व चिड व्यक्त केली जात आहे.


राष्ट्रीय महामार्गावरील ईटकळ ..अणदूर.. जळकोट येथे अर्धवट कामामुळे अनेकांचे प्राण गमावलेले आहे एवढेच नव्हे तर शेतकरी संघटना स्थानिक नागरिक यांनी रास्ता रोको केले टोल वसुली विरुद्ध आवाज उठवला मात्र प्रशासनाने तब्बल 14 वर्षानंतर ही ना दखल, ना कारवाई असे शेळीच्या शेपटासारखे अवस्था सर्वसामान्यांची झाली असून दाखवता येत नाही आणि झाकता येत नाही अशी अवस्था निर्माण झाल्याने तीव्र संताप  व्यक्त केले जात आहे.

अणदूर हे राष्ट्रीय महामार्गा वरील तब्बल 30 हजार लोकवस्तीचे गाव असून चिवरी पाटील ते बसस्थानक अवघ्या एक किलोमीटर अंतराचे उड्डाणपूलाचे काम अर्धवट व कुचकामी असून जवाहर महाविद्यालय, वस्तीगृह घोडके वस्ती, मधुशाली नगर विद्यार्थी व नागरिकांना ये जा करण्यासाठी जीवघेवा प्रवास करावा लागत आहे.  रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


अणदुर ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधित अधिकारीआणि प्रशासनास  लेखी तक्रार देऊनहीं याकडे दुर्लक्ष करुन  उडवा उडवीची उत्तरे मिळत असून तातडीने उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार यांनी व्यक्त केली आहे.
 
Top