हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ प्रजास्ताक दिनी प्रकाश साखरे यांच्या तर्फे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
नळदुर्ग,दि.२७:
तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथिल जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिनी बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यानी प्रतीवर्षा प्रमाणे विद्यार्थ्यांना वही, पेन, असे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव ता. तुळजापूर येथील पहिली ते सातवीच्या सर्व विध्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप गावचे ग्रामसेवक एल बी शेख सरपंच शुभांगी भोवळ, माजी सरपंच रमेश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कर्यक्रमासाठी शाळेंचे मुख्याध्यापक अरविंद माशाळे , सहशिक्षक अतुल पोतदार ,उमेश भोसले , निगाप्पा नडगेरी , तसेंच गावातील ज्ञानेश्वर शेंडगे, किंचू बचाटे, शंकर भोरे, राम मुळे आदी नागरिक उपस्थित होते.