वागदरी येथे ठिक ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम सपन्न

वागदरी,दि.२७:एस.के.गायकवाड  

तुळजापूर तालूक्यातील मौजे वागदरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी राष्ट्रीय ध्वजारोहणासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  
 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापण दिना निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतिय संविधानाचे शिल्पकार भारतरल डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेचे व ध्वज कट्टयाचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहन करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय तिरंगा ध्वजास सलामी, राष्ट्रगीत, ध्वज गीत, महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तर येथील ग्राम पंचायतीच्या वतीने ही सर्व ग्रामस्थांच्यां उपस्थित सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचे सादरीकरण केले.
 

 तसेच येथील पंचशिल बुध्द विहार समाज मंदिराच्या प्रागंणात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारभी सरपंच तेजाबाई मिटकर, उपसरपंच सुरेखाबाई यादव, ग्रा. प. सदस्या मुक्ताबाई बिराजदार, गुणाबाई बनसोडे, शाळेच्या मुख्याध्यापका महादेवी जत्ते यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिकरित्या संविधानाच्या उद्येशिकेचे वाचन करण्यात आले.
  शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिना निमित्ताने शालेय विद्यार्थ्याच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 यावेळी सरपंच तेजाबाई मिटकर, उपसरपंच सुरेखाबाई यादव, ग्रा. प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, रिपाइ आठवले जिल्हा समन्वयक तथा पत्रकार एस. के. गायकवाड, पत्रकार किशोर धुमाळ, रामसिंग परिहार,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, भाजपचे तालुका उपाध्यक्ष किशोर सुरवसे, नंदु बिराजदार, शंकर भडांरे, सहशिक्षक तानाजी लोहार, सहशिक्षिका रेखा साखरे, संपदा माडजे, अगणवाडीच्या पद्ममिनीबाई पवार, रुपाली जाधव सह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top