दत्तू आण्णा पाटील विद्यालयाने केले  गुणवंत विद्यार्थी तयार आमदार राम कदम

अणदूर , दि.१२: श्रीकांत अणदूरकर

आई वडील हे आपले पाहिले गुरू आहेत,विद्यार्थ्यांनी   आई वडिलांना अभिमान वाटेल एवढं कर्तृत्वाने मोठं व्हावं,आपल्याला गावच्या गावाच्या मातीचा स्वाभिमान असायला हवा, स्वप्न मोठी पहा, ग्रामीण भागातील दत्तू आण्णा पाटील विद्यालयाने दर्जेदार विद्यार्थी घडवले,चिवरी गावाला या शाळेचा अभिमान असल्याचे प्रतिपादन घाटकोपर पश्चिम चे भाजपा आमदार राम कदम यांनी केले.

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू आण्णा पाटील विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमात आ. कदम हे बोलत होते, यावेळी,घाटकोपर येथून चौथ्यादा आमदार झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने राम कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई कदम यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

आमदार राम कदम यांनी चिवरीचे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरास पण भेट दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील, अध्यक्षा मनीषा पाटील, प्रतीक पाटील,चिवरीचे सरपंच पिंटू बिराजदार, उपसरपंच लबडे, मेजर विठ्ठल होगाडे, अविनाश गंगणे, धनंजय गंगणे, बालाजी पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी बिराजदार,शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top