गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज.. भगीरथ कुलकर्णी ; दर्पण दिन सप्ताह निमित्त श्री क्लासेसच्या वतीने पत्रकारांचा गौरव
अणदूर.. दि.12 : चंद्रकांत हागलगुंडे
गुण आणि गुणवत्ता याची सांगड घालून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज असून विद्या विकास शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संगोपन आणि सुसंस्काराचे धडे खऱ्या अर्थाने या संस्थेत प्रकर्षाने पहावयास मिळते असे गौरव उदगार मराठीचे गाढे अभ्यासक तथा निवृत्त मुख्याध्यापक भगीरथ कुलकर्णी गुरुजी यांनी व्यक्त केले.
ते दर्पण दिन सप्ताह निमित्त श्री क्लासेसने आयोजित केलेल्या पत्रकार बांधवांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष बसवराज निसरगुंडे, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत अणदूरकर, शिवाजी कांबळे, राजेंद्र स्वामी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, या संस्थेचे सुरुवात प्रबळ इच्छाशक्ती, आणि सुसंस्कार असून अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्ता प्रबळ व प्रेरणादायी असल्याचे सांगून निवासी शाळा ही टीव्ही, मोबाईल सारख्या क्षणभंगुर गोष्टी पासून दूर असून वाचन संस्कृती आणि अध्यापन ही परंपरा प्रेरणादायी असून भावी पिढी राष्ट्रभक्तीने प्रेरित करणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना बसवराज निसरगुंडे म्हणाले की, ही संस्था निव्वळ आर्थिक साधन बनवणारी नसून गुणवत्ता व नाविन्यपूर्ण , सक्षम पिढी निर्माण करण्याचा मानस असून अनेकांचे मार्गदर्शन व योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगून अवघ्या तीन वर्षात स्पर्धात्मक स्पर्धेत अनेक विद्यार्थी नाविन्यपूर्ण शिक्षण घेऊन विविध स्पर्धेत नावलौकिक कमाव ल्याचे सांगितले.
यावेळी संचालिका दीपाली निसरगुंडे, गौरी शिरतोट, श्रद्धा नरवडे, पूजा मोकाशी, भाग्यश्री बिराजदार, सानिका मुळे, रवी कदम आदीसह पत्रकार, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.