राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि वाचन क्लास संपन्न

नळदुर्ग,दि.१२
आम्मा वाचनालयाच्या वतीने १२ जानेवारी रोजी राजमाता माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आम्मा वाचनालयचे संचालक व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.
दर रविवारी एक तास वाचन क्लास सुरु करुन विनायक अहंकारी यांनी लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत..आज नळदुर्ग शहरातून अनेक मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
आज आम्मा वाचनालयकडून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धामध्ये अनेक मुला मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेतला होता.

लहान मुली तर माँ जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीच्या रूपात आल्या होत्या.सुरुवातीला नळदुर्ग शहरातील मान्यवरही या लहान मुलासोबत पुस्तकं वाचण्यात दंग झाले होते.

यावेळी भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर, हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, पत्रकार विलास येडगे ,उत्तम बणसगोळे , तानाजी जाधव, डॉ. जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, आंबाबाई देवस्थानचे अध्यक्ष रमेश जाधव, मनसेचे प्रमोद कुलकर्णी, उमेश जाधव ,बंडाप्पा कसेकर,राजेंद्र महाबोले, संजय रेड्डी,प्रदीप ग्रामोपाध्याय नीलकंठ स्वामी,संतोष जाधव,राजकुमार वैद्य,अनिल पाटील,ज्ञानेश्वर केसकर, रोहित वाले उपस्थित होते..यावेळी डॉ.जितेंद्र पाटील यांच्यावतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तर नरेंद्र यादगिरे यांनी मुलांना वही पेन बक्षीस म्हणून दिले.

 अहंकारी यांनी सुरु केलेला हा उपक्रम येणाऱ्या काळात नळदुर्ग शहरात खूप मोठया प्रमाणात मुले सहभागी होतील असे वाटते. यावेळी मान्यवराच्या हस्ते माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमोद कुलकर्णी यांनी आम्मा वाचन कट्टास पुस्तके भेट दिली.
 
Top