कुलस्वामिनी  आश्रम शाळेचा मुलीचा कब्बड्डी संघ विभागातून व्दितीय 

नळदुर्ग,दि.२३:


विभागीय आश्रम शाळा क्रीडा  स्पर्धे मध्ये  श्री कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जळकोट या  14 व 17 वर्षे वयोगटातील मुलीचा कब्बड्डी संघ विभागातून व्दितीय आला असून 14 वर्ष  वयोगटातील 100 मीटर धावणेत विभागातून कृष्णा संतोष चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला व 17 वर्ष वयोगटातुन कोमल परशुराम राठोड हिने लांब उडी मध्ये विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला

   दि. 21जानेवारी रोजी झालेल्या विभागीय आश्रम शाळा क्रीडा महोत्सवामध्ये  श्री कुलस्वामिनी प्राथमिक व श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळा जळकोट या संघानी  सहभाग नोंदवून कबड्डी या खेळामध्ये विभागातून व्दितीय क्रमांक  पटकाविले.सदर क्रीडा स्पर्धा  नाईक नगर आश्रम शाळा उदगीर,लातूर येथे संपन्न झाल्या. यामध्ये धाराशिव लातूर नांदेड,हिंगोली येथील आश्रम शाळेने क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळांमध्ये सहभाग घेतलेला होता त्यामध्ये  श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळा जळकोट 14  वर्ष वयोगटातील मुलीचा संघ जिल्ह्यामध्ये प्रथम येऊन विभागासाठी पात्र झाला होता तसेच  श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळा जळकोट येथील 17 वर्ष वयोगट कबड्डी मुलीचा संघ जिल्ह्यामध्ये प्रथम येऊन विभागासाठी सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करून घवघवीत यश संपादन केले व विभागातून व्दितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाबद्दल *प्रादेशिक उपसंचालक लातुर   दिलीप राठोड ,* *सहाय्यक संचालक धाराशिव बाबासाहेब अरवत *  *तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चंचलादेवी चव्हाण , धाराशिव  जि.प.सदस्य  प्रकाश चव्हाण , प्राचार्य संतोष चव्हाण  प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका  आशा पवार मॅडम* यांनी सहभागी सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
 
Top