महात्मा फुले इतिहास अकादमीची
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने भैरवनाथ कानडे यांचा गौरव 

 नळदुर्ग,दि२५: एस के गायकवाड 

महात्मा फुले इतिहास अकादमी ,राष्ट्र सेवा समूह , रयत प्रकाशन व गिरी प्रेमी ग्रुप , पुणे यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्याबददल देण्यात येणारा "महात्मा फुले , सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार " तुळजापूर तालुक्यातील चिकुद्रा येथील .श्री . भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक भैरवनाथ खडू कानडे यांना माजी खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .


राज्यातील  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांना देण्यात येणारा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा(दि २३ ) रोजी पुणे येथील एस . एम . जोशी सभागृहात पार पडला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे विभाग शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, आयआरएस विपुल वाघमारे, श्रीराम शिक्षण संस्थेच्या प्रमुख सौ. श्रीलेखा पाटील, शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजीराव खांडेकर, जयहिंद साखर कारखान्याचे चेअरमन गणेश माने - देशमुख,  महात्मा फुले इतिहास अकादमीचे  अध्यक्ष तथा जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे , महेशआप्पा शिंदे ,  योगेश निंबाळकर आदींची उपस्थिती होती . भैरवनाथ कानडे हे ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य व विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत . त्यांनी आजतागायत शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , पत्रकारिता , साहित्य व निवेदन क्षेत्रात भरीव योगदान दिले असून यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
Top