रासेयो विशेष शिबिरात ग्रीन क्लबची पाणी बचत, पर्यावरण संवर्धन रॅली 

नळदुर्ग,दि.२१: डॉ. दिपक जगदाळे 

नळदुर्ग येथिल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून  तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे राष्ट्रीय सेवा योजना  विशेष वार्षिक शिबीरादरम्यान ग्रीन क्लब समन्वयक प्रा. डॅा.उद्धव भाले यांच्या संकल्पनेतून आणि नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण आणि जपवणूक विषयक व्याख्यानासाठी एक दिवस ‘ग्रीन क्लबची कार्यप्रणाली'  राबवण्यात आला.

यादरम्यान (दिनांक २१ ) रोजी सकाळी गावातून विद्यार्थी व ग्रामस्थांसह रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ग्रीन क्लब,राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी- विध्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते. ज्यामध्ये पर्यावरण जनजागृती, पाणी बचत व प्लास्टीक फ्री गाव, झाडे लावा, ऊर्जा बचत या अनुषंगाने घोषणांनी व संबोधनांनी गाव दणाणून निघाले. या विषयांच्या अनुषंगाने  विविध फलकांचे प्रदर्शन करत विद्यार्थ्यांमार्फत गावातील बोरवेल्स, नळयोजना गळती लागलेले  नळ शोधून दुरूस्त करण्यासंदर्भाने गावकऱ्याशी विनंत्या करने, सांडपाणी व कचरा विल्हेवाटीसंदर्भात तातडीने संबंधीत नागरिकांस संबोधन करणे अशा अनेक पर्यावरणपूरक  घोषवाक्यांनी वातावरण निर्मीती करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला आणि भैरवनाथ कानडे माध्यमिक शाळा चिकुंद्रा येथेही नैसर्गीक संसाधनाची जपवणूक आणि पाणी बचत संदर्भाने तेथील शिक्षक विध्यार्थी आणि विध्यार्थीना महत्व ग्रीन क्लबच्या माध्यमातून विषद करण्यात आले.

त्यानंतर दुपारच्या सत्रात ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक डॅा.उद्धव भाले यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना ‘ "नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व जपवणूक युवकांची भूमिका " या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या गावांमध्ये नैसर्गिक संसाधनाची जपणूक त्यामध्ये पाणीबचत , ऊर्जा व्यवस्थापन ,कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये ग्रीन क्लब ची भूमिका,कार्य  आणि उद्देश यावर दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या नैसर्गिक  संसाधनाचा उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले व त्याद्वारे ग्रीन क्लबच्या सर्व उद्देशांची मांडणी त्यांनी उपस्थितांसमोर करून एकंदरीत YEWS (युवा सहभागाने पाणी बचत) अभियान सहजपणे सर्वांसमोर ठेवून त्याचे महत्व पटवून देत उपस्थितांचा विश्वास व प्रतिसाद प्राप्त केला.प्रा.डॅा.उद्धव भाले यांच्या कृतीप्रवणतेनी राबवलेला हा उपक्रम ग्रीन क्लब अभियानामध्ये विशेष महत्वाचा आहे. आपल्या जवळ असलेल्या अँड्राईड मोबाईल मधील व्हाय वेस्ट नावाच्या ॲपद्वारे आपण स्वतःपासून कशाप्रकारे पाणी बचत करू शकतो . याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या व्याख्यानातून केले .
 

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा . दादासाहेब जाधव,  प्रा . बाबासाहेब, प्रा. डॉ. युवराज पाटील, प्रा . डॉ निलेश शेरे, प्रा .डॉ . हंसराज जाधव,  प्रा धनंजय चौधरी ,प्रा संजय गोरे, श्री माणीक राठोड, श्री रमेश सर्जे , भागिनाथ बनसोड तसेच ग्रीन क्लब मधील व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थी  विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . दादासाहेब जाधव होते . तर आभार बाबासाहेब सावते  यानी मांडले. तर सुत्रसंचलन प्रा .डॉ .युवराज पाटील यानी केले. 
 
Top