इंडियन स्टुडंट कौन्सिल चा सावित्रीची लेक -आदर्श शिक्षिका पुरस्कार बबीता महानुर याना जाहीर
वागदरी ( एस .के . गायकवाड ):
महाराष्ट्र संचालनालय, पुरातत्व विभाग पुणे व इंदियन स्टूडंट कौन्सिल यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात उलेखनिय कार्य करणाऱ्या महिलाना दिला जाणारा सावित्रीच्या लेकी हे पुरस्कार जाहीर झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीआदर्श शिक्षक पुरस्कार हा तुळजापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा मुर्टा येथील बबीता महानुर याना जाहीर झाला आहे.
लोकशाही, समाजवाद धर्मनिरपेक्षता, विज्ञानभिमूखता व राष्ट्रवाद ही पंचसूत्री आदर्श मानून माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची समतावादी संघटना हे घोषवाक्य घेऊन स्थापन झालेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलने अवघ्या ५ वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्याचे व विनाअनुदानित तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांचे निकडीचे प्रश्न अग्रक्रमाने हाती घेऊन धसास लावणारी इथल्या सामाजिक प्रश्नांबद्दल जाण व आस्था असणारी एकमेव संघटना आहे. या संघटने मार्फत आणि महाराष्ट्र संचालनालय, पुरातत्व विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.
या वर्षी च्या सावित्रीच्या लेकी पुरस्काराच्या मानकरी राजकीय क्षेत्रातील मा.आ.यशोमतीताई ठाकूर(अमरावती), मानव्यविद्या शाखा संशोधन क्षेत्रांतील प्रा.डॉ.माधवी महाके(लातुर) तर विज्ञान शाखेतील संशोधन क्षेत्रातील प्रा.डॉ.अनिता पाटील (अमरावती), सांस्कृतिक क्षेत्रातील अभिनेत्री अश्विनी गिरी(पुणे), प्रशासकीय प्रा.डॉ.भावना पाटोळे (मुंबई) शैक्षणिक प्रा.डॉ. प्रज्ञा अशिर्वाद(मुंबई), सामाजिक- अनिता मशराम (नागपूर ) व आदर्श शिक्षक बबीता महानोर( धाराशिव)या ठरल्या आहेत .
महाराष्ट्र संचालनालय, पुरातत्व विभाग पुणे व इंडियन स्टूडंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार हा दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ४:०० म. फुलेवाडा, समता भूमी, गंजपेठ पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती इंडियन स्टुडंट कौन्सिल,महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम, उपाध्यक्ष प्रा.माधुरी राऊत, तसेच प्रा.डॉ.धनाजी थोरे, प्रा.डॉ. सीमा शेटे, प्रा.डॉ. मीता रामटेके, यांनी दिली आहे.