निस्वार्थ व तळमळीची सेवा फक्त पत्रकारच देऊ शकतो- वैजिनाथ शेटे 

तुळजापूर ,दि.०९:

सध्याच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण स्वतःचे कसे भले होईल, त्यातून खऱ्या अर्थाने कमाई कशी होईल, प्रत्येक जण स्वार्थ साधण्यात अग्रेसर असला तरी निस्वार्थ व तळमलीने सेवा देण्याचे काम केवळ पत्रकारच करू शकतो असे स्पष्ट मत जिजाऊ इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष वैजीनाथ शेटे  यांनी व्यक्त केले.

जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात अणदूर येथील पत्रकारांचा दर्पण दिनाचे औचित्य साधून शाल फेटा पेंन देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. विशाल शेटे यांनी केले. धाराशिव बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, बाल कल्याण समितीच्या माध्यमातून निराधार, आई-वडिलांचे छत्र हरपलेले अशा जवळपास 5 हजार बालकांची संगोपनाची, शिक्षणाची, आधार देण्याची जबाबदारी पार पाडत असून समाजानेही अशा निराधारांना पाठबळ देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, समाजातील भ्रष्टाचार ,विसंगती दूर करण्याचे काम निव्वळ पत्रकारच करत असला तरी त्याला खऱ्या अर्थाने समाज आणि राजकारण यातून पाठवा मिळत नसल्याची खंत व्यक्त करून निव्वळ पत्रकारांचा वापर करून घेण्याचे काम मात्र केले जात असल्याचे सांगून निस्वार्थ सेवा देणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी सर्वश्री दयानंद काळुंके, चंद्रकांत हगलगुंडे, श्रीकांत अनदूरकर, चंद्रकांत गुड, सचिन तोग्गि, प्रसन्ना कंदले, संजू आलूरे, गुरुनाथ कबाडे, शिवशंकर तिरगुळे, कैलास बोंगरगे, नागेश करपे, राहुल कांबळे, किरण कांबळे सह शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.