राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी विलास राठोड यांची नियुक्ती; भारतीय जनता पार्टी पदाधिका-यांच्यावतीने सत्कर
नळदुर्ग,दि.०८
अलियाबाद ता.तुळजापूर येथील संत श्री सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेचे जिल्हा अशासकीय सदस्य, भाजपचे तालुका सरचिटणीस विलास राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच उपाध्यक्षपदी रामतीर्थचे माजी सरपंच दामाजी राठोड यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी जळकोटवाडीचे माजी सरपंच वसंत पवार यांची नुकतेच गोर धर्मपीठ लोधीवली, मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद अधिवेशनाच्या कार्यक्रमात पोहरदेविचे धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज,धर्मनेता किसन राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड, प्रदेशाध्यक्ष भिकन जाधव ,मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे राज्याचे प्रमुख रामेश्वर नाईक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
विलास राठोड यांचे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून सामाजिक जनहित जोपासून संघटनेचे नाव उज्वल कराल ही अपेक्षा तसेच गोरबंजारा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक धार्मिक आर्थिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहून राष्ट्रीय बंजारा परिषद ही संघटना मजबूत करावे असे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भिकन जाधव यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे .
या निवडीबद्दल जळकोट ता.तुळजापूर येथे भाजपा तालुका पदाधिकारी यांच्यावतीने तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा सरचिटणीस अँड दीपक आलुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशिष सोनटक्के, माजी जि प सदस्य गणेश सोनटक्के आदी मान्यवरांच्या हस्ते विलास राठोड , वसंत पवार, दामाजी राठोड यांचा फेटा बांधून शाल व हार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य.प्रभाकर मुळे, संजय माने ,अप्पू किलजे ,अनिल बेडगे,मनोज चव्हाण आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .