व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी तिरगुळे तर कार्यवाहकपदी काळुंके यांची निवड
तुळजापूर. दि.२५: चंद्रकांत हागलगुंडे
पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी शिवशंकर तिरगुळे तर संघटकपदी दयानंद काळुंके यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गेले पंधरा वर्षापासून जय मल्हार पत्रकार संघ विविध उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या पत्रकार संघाचे शिवशंकर तिरगुळे, दयानंद कांळुके सदस्य आहेत. संघातील सर्वच पत्रकार विविध वृत्तपत्रात आपल्या नि पक्ष लेखणीने परिचित असून त्यांचे अभिनंदन केले जाते. संघाचे सर्वेसर्वा श्रीकांत अणदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ एकसंघ असून जिल्ह्यात अग्रगण्य आहे. संघाच्या माध्यमातून वर्षभर नेत्र दीपक कामगिरी असून नुकतेच ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मानित करून आशीर्वाद देण्यात आले. यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, माजी मंत्री मधुकर चव्हाण, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, सरपंच रामचंद्र अलुरे यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम अंदूरकरांना भारावून गेल्याचे प्रतिक्रिया जानकरातून ऐकवायला मिळते. प्रतिवर्षी संघाचे दिनदर्शिका मोफत वाटप करण्यात येत असून बहुरंगी सर्वसमावेशक दिनदर्शिका सर्वसामान्यांना प्रेरणा व दिशा देणारे असल्याचे प्रतिक्रिया ऐकावयास मिळते. तिरगुळ व काळुंखे यांच्या निवडीबद्दल सर्व थरातूनअभिनंदन केले जात आहे.