सिंदगाव  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश  बिराजदार यांची बिनविरोध निवड 

नळदुर्ग,दि.२५:

  सिंदगाव ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश श्रीमंत बिराजदार यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

        
सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते. रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम तुळजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी काढल्यानंतर दि. 24 जानेवारी 2025 रोजी सिंदगावच्या सरपंचपदासाठी निवडणुक घेण्यात आली.
       
 पंचायत समितीचे अधिकारी ए. सी. कवळे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपस्थित होते. तर त्यांना सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक बसवराज घोगरे यांनी काम पहिले. सरपंचपदाची निवडणुक बिनविरोध पार पडली सुरेश श्रीमंत बिराजदार यांची सिंदगावचे सरपंच म्हणुन बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी कावळे यांनी जाहीर केले. यावेळी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद मेलगिरी, ग्रामपंचायत सदस्या पुजा कांबळे, सुवर्णा गायकवाड व लक्ष्मी शिंदे हे उपस्थित होते.
         
सरपंच निवडीच्या कार्यक्रमास माजी सरपंच जयहिंद मेलगिरी, माजी चेअरमन श्रीपती ताडकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मलप्पा पाटील, सोसायटीचे चेअरमन सिद्राम परशेट्टी, व्हाईस चेअरमन श्रीकांत बिराजदार, शिवानंद करंडे, बलभीम पांढरे,श्रीकांत कोकरे, अंगद जाधव, बोळेगावचे सरपंच विलास पाटील, राजेंद्र बेडजीरगे, चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय बनजगोळे, ज्ञानेश्वर रेड्डी,अंबादास लकडे, मारुती टकले, अमोल पाटील रमेश गडदे, दादा पाटील, मल्लिकार्जुन गायकवाड, खंडेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित  होते.
 
Top