सुरतगांव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आनंद बाजार संपन्न
इटकळ,दि.१४:
दि. 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुरतगाव ता. तुळजापूर या शाळेत बालगोपालांचा सहशालेय उपक्रम आनंद मेळावा अर्थात आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान व्हावे. त्यांना पैशाचे व्यवहार करता यावेत.फोन पे,गुगल पे च्या माध्यमातून व्यवहार करता यावा.म्हणून शाळेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांतीचा सण असल्या कारणाने या बाजारात भोगीसाठी लागणारे सर्व साहित्यही ठेवण्यात आले होते.बालगोपाळांनी त्यांच्या पालकांच्या सहकार्यातून करण्यात आलेल्या मिठाईचे स्टॉल लावण्यात आले होते. पालकांच्या शेतातील पालेभाज्या व इतर फळेही ठेवण्यात आली होती. कडधान्य व अन्नधान्य यांचीही स्टॉल लावण्यात आले होते,स्टेशनरी साहित्याचे स्टोअर्स,सौंदर्य सौंदर्यप्रसाधनाचे स्टॉल्स अशा अनेक प्रकारची स्टॉल्स विद्यार्थ्यामार्फत लावण्यात आले होते.तसेच शाळेतर्फे आनंद बाजारात आलेल्या गावातील जेष्ठ नागरिक,व माता भगिनी यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी Happy cheak up.ठेवण्यात आला होता.
सर्व गावकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घेतला. गावाकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत.आजच्या आनंद बाजारातून पंधरा हजार रुपयाच्या पुढे उलाढाल केली. यावेळी गावचे उपसरपंच बाबासाहेब गुंड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब गुंड, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य नवनाथ सुरते,शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम क्षीरसागर विठ्ठल गुंड सर व सर्व शिक्षक वृंद तसेच बहुसंख्य पालक वर्ग या आनंद बाजारामध्ये उपस्थित होता.